Advertisement

Breaking News
Loading...

अकोले मंद्रूप येथे ऊसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे लागली आग.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले- मंद्रूप येथील ज्ञानेश्वर माने यांच्या ऊसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांना यासंदर्भात कल्पना दिली.सागर कोळी यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत सद दुर्घटनेबद्दल कळवल्यानंतर गावातील जवळपास 30 ते 40 गावकरी एकत्र येऊन उसाला लागलेली आग विझवले.गट नंबर 102 मधील जवळपास अर्धा एकर ऊस शॉर्टसर्किटच्या कारणावरून जळाला आहे.आजूबाजूचा दहा ते पंधरा एकर ऊस ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या कॉलमुळे वाचविण्यात यश आला आहे.याबद्दल ज्ञानेश्वर माने यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा व तसेच गावकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....




Post a Comment

0 Comments