Advertisement

Breaking News
Loading...

“सहा विषय, एकच आकडा! सर्व विषयांत एकसमान ३५ गुण; निकिताची ‘युनिक’ कामगिरी चर्चेत...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थी उच्च गुण मिळवून यश साजरे करत असताना, बाळे येथील ज.रा. चंडक प्रशालेची विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने मात्र वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निकिताने सर्व विषयांत अगदी समान — प्रत्येकी ३५ गुण मिळवत एक अनोखी नोंद केली आहे.


मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या सहाही विषयांत तिने एकसारखेच ३५ गुण मिळवले. दहावीच्या परीक्षेत ‘पासिंग मार्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुणसंख्येतच सर्व विषय पार करणे ही दुर्मीळ बाब मानली जात असून तिच्या निकालाची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

निकिताच्या या वेगळ्या कामगिरीमुळे शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून तिचे अभिनंदन होत आहे. “प्रत्येक विषयात समान गुण मिळणे ही केवळ योगायोगाची बाब नसून, निकालातील एक आगळावेगळा पैलू आहे,” अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.

दरम्यान, नेहमी उच्च गुणांच्या स्पर्धेत लक्ष वेधले जाणाऱ्या निकालांमध्ये निकिताची ही ‘समान गुणांची’ कामगिरी वेगळी ओळख निर्माण करणारी ठरली आहे. तिच्या या निकालाने सोशल मीडियावरही उत्सुकता निर्माण केली असून, अनेक जणांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments