Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सासर्‍याला पेटवून देणार्‍या जावई आणि मुलीवर गुन्हा दाखल

फिर्यादी शंकर जगलु पवार (वय 60 वर्ष),रा.शिंगडगाव,ता.द.सोलापूर यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार दि.12/09/2023 रोजी सायंकाळी 05 वाजण्याच्या सुमारास शिंगडगाव,ता.द.सोलापूर येथील फिर्यादीच्या राहत्या घरात येवुन करण शामा चव्हाण रा.नालासोफारा मुंबई हा घरात येवुन फिर्यादीची मुलगी विमल यांना शिवीगाळी करत फिर्यादीला म्हाता-या तुला जास्त मस्ती आली आहे,तुला बघतोच,असे म्हणुन हाताने चापट मारली.फिर्यादीची पत्नी मारु नका असे म्हणत असताना तिलापण शिवीगाळी करुन चापट मारले आहे.तू माझ्या संसाराचे वाटोळे केले असे म्हणुन मुलगी विमल करण चव्हाण हि पण त्याचे जवळ जावुन तुम्ही मला सांभाळलेले नाही असे म्हणुन शिवीगाळी करु लागली.त्यावेळी करण शामा चव्हाण याने त्याच्या खिशातील पेट्रोलची प्लॉस्टिकची पिशवी काढुन म्हाता-या तुला आता जिवंत ठेवत नाही,असे म्हणुन पेट्रोलची पिशवी फिर्यादीच्या अंगावर फेकुन मारुन फिर्यादीला पेटवुन देवुन जिवेठार मारण्याच्या उद्देशाने पेटवुन गंभीर जखमी केले आहे.म्हणुन करण शामा चव्हाण,विमल करण चव्हाण दोघे रा.नालासोपारा मुंबई यांच्या विरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वळसंग पोलीस करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments