सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे वतीने साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर , राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, आणि राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रवी कुमार देवकर, अक्कलकोट तालुका अध्यक्ष गंगाधर शिवशरण, दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, उत्तर सोलापूरचे अध्यक्ष नितीन गायकवाड , दक्षिण सोलापूरचे सरचिटणीस राम गायकवाड , संघटनेचे राज्य संघटक प्रा.अभिजीत भंडारे, महिला विभागाच्या महानंदा शिंदे , आकाश शिंदे, युनूस बाळगी, दिलीप गायकवाड, महबूब तांबोळी इत्यादी पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड , दत्तात्रय शिंदे , राम गायकवाड इत्यादींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला . शेवटी प्रा भंडारे यांनी सर्वांचे आभार मानले.


0 Comments