Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

औज अपघातातील बलकर चालकासह एकावर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

 फिर्यादी बसवराज कुशाबा दोडतले (वय 29),रा.औज,ता.द.सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार चट्टीनाड सिमेंट कारखान्यातील सिमेंट भरण्याकरिता येणारी-जाणारी वाहने नेहमी औज गावातील रस्त्याने येत जात असतात.त्यामुळे सोलापूर चेट्टीनाड सिमेंट कारखान्याच्या लॉजिस्टिक विभागाच्या प्रमुखांनी त्यांच्या कारखान्यातील सिमेंट वाहतूक करणाऱ्या चालकांच्या योग्यते बाबत खातरजमा न केल्याने तसेच बलकर चालक विकास विठ्ठल डोबाळे,रा.वागदरी,ता.गंगाखेड,जि.परभणी याने दि.31 आँगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील बलकर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून तो बलकर स्टैंडवर व शाळेच्या भिंतीवर पलटी झाला.या अपघातात 1) प्रज्ञा बसवराज दोडतले (वय 9 वर्षे) 2)विठोबा कोंडीबा शिंगाडे (वय 65 वर्षे),दोघेही रा.औज ता द सोलापूर 3) महेश शशिकांत इंगळे (वय 17 वर्षे),रा.नई जिंदगी,सोलापूर 4)अनिल नामदेव चौधरी (वय 50 वर्षे),रा.दहिटणे,ता.अक्कलकोट वरील चार जणांचा मृत्यू झाला आहे.1) काजल शिलप्पा माशाळे (वय-9 वर्षे),रा.औज 2) इरावती रावसाहेब बनसोडे,(वय 55), रा.बर्हानपुर,ता.अक्कलकोट या दोघांना जखमी केले आहे.तसेच गावातील एसटी स्टैंडचे लोखंडी शेड आणि जिल्हा परिषद शाळेचे गेट व भिंत पाहून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले आहे.


म्हणून आरोपी विकास विठ्ठल डोवाळे,राहणार वाघदरी,तालुका गंगाखेड,जिल्हा परभणी व सोलापूर चड्डीनाड कारखान्याचे लॉजिस्टिक विभागाचे प्रमुख यांच्याविरोधात वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि सनगल्ले हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments