Advertisement

Breaking News
Loading...

माळकवठा- निंबर्गी रोडवरील अपघातातील 9 जखमी महिलांची ओळख पटली

दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा ते निंबर्गी रोडवर दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महिंद्रा मॅक्सिमो वाहन त्याचा क्रमांक एम एच 13 डी क्यू 2038 पलटी झाल्याने त्यातील आठ ते दहा महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.यातील जखमी महिलांना मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तर काही जखमी महिलांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या जखमी महिलांमध्ये सखुबाई गंगाराम बनसोडे (वय वर्ष 60), मुमताज नदाफ (वय वर्षे 45), कस्तुरा रेवणसिद्ध कांबळे (वय वर्ष 55), मुस्कान इलाही नदाफ (वय वर्षे 16), सुनंदा बाळासाहेब काळे (वय वर्षे 35), मुमताज बंदेनवाज नदाफ (वय वर्षे 40), मल्लमा रेवणसिद्ध कांबळे (वय वर्ष 35), प्रेमा पंचप्पा गायकवाड (वय वर्षे 34), मयुरा सदाशिव वाघमारे (वय वर्षे 40) यांना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 108 ॲम्बुलन्स डॉक्टर संदीप चव्हाण यांनी दाखल केले.

रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments