Advertisement

Breaking News
Loading...

गुंजेगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आ.सुभाष देशमुख यांना निवेदन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात जालना येथे मराठा समाज बांधवांवर अमानुष लाठीमाराचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.


राज्यात आपली सत्ता असतानाही मराठा आमदार एकत्रितपणे येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काहीही करू शकत नाहीत.त्यासाठी कोणतीही भक्कम अशी बाजू मांडू शकत नाहीत आणि आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणतीही

भक्कम भूमिका बजावताना दिसून येत नाहीत,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


सदर निवेदन देताना खंडू हजारे,निवृत्ती मूरडे,सोपान सुतार,तुषार पाटील,विनायक जाधव,शशिकांत पवार यांच्यासह गुंजेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments