Advertisement

Breaking News
Loading...

औज आहेरवाडी येथील अपघात ठिकाणाचा व्हिडीओ आला समोर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील बस स्टॉप वर सिमेंट वाहतूक करणारा बलगर अचानक पलटी झाला.त्याखाली औज गावातील विठ्ठल शिंगाडे (वय वर्षे 60),मुलगी प्रज्ञा दोडतले (वय वर्षे 12),महेश इंगळे (वय वर्षे 10),अनिल चौधरी (वय वर्षे 50) यांचा जागीच मृत्यू झाला.


वळसंग पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून क्रेनच्या माध्यमातून बलगर हटवून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सध्या सुरु आहे.


घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे,उपजिल्हाधिकारी उदमले,बीडीओ बाळासाहेब वाघ,दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले,मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील पोलिस कर्मचारी,महसूल,आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments