Advertisement

Breaking News
Loading...

शेतात पाणी सोडण्यावरुन तरुणास जीवे मारण्याची धमकी

 द



क्षिण मतदारसंघातील कुमठे येथे घराजवळील शेतामध्ये पाणी सोडण्याच्या कारणावरुन तिघांनी मिळून माझ्या मुलास खलास करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याची तक्रार सुरेखा मोहन माने (वय वर्ये ४५,रा.कवठे,माने वस्ती,सोलापूर) यांनी दिल्याने तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास अनिल माने,अनिल माने,सुलोचना अनिल माने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.फिर्यादीची कुमठे गावात घराजवळ शेती आहे.मारहाण करणारे लोकही भावकीतील आहेत.शेतात पाणी सोडण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या मुलाला आरोपींनी शिवीगाळ केली.ती सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीला 'तू मध्ये पडू नको,आम्ही याला खलास करतो' तशी धमकी दिली.यात फिर्यादीलाही ढकलून दिल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस नाईक सुरवसे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments