Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रेस करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी

मित्रांमध्ये मोटारसायकल रेस करण्याच्या कारणावरून वाद झाल्याने एका तरुणास फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.अमोल सुनील चव्हाण (वय वर्षे 21,रा.मुळेगाव तांडा,ता.द.सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद धोत्रे,सूरज धोत्रे,रोहित धोत्रे,सतीश धोत्रे,पवन कचरापुरे,युवराज,आनंद धोत्रे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही घटना शिवशक्ती चौक,अविनाश नगर येथे घडली.मोटारसायकल रेस करण्याच्या कारणावरून

फिर्यादीचा मित्र मनीष बेळमकर याला आनंद धोत्रे यांनी कोयत्याने वार करून हाताच्या मधल्या बोटास मारून नखापासून तोडले आहे.तसेच इतरांनी फायटर व दगडाने मारहाण करून जखमी केल्यानंतर या सर्वांनी मिळून सुनील नगर येथे सागर बेळमकर यांच्या टेम्पो गाडीची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान,गाडीला कट का मारला असे विचारल्याच्या कारणावरून रोहित राम धोत्रे (वय वर्षे २१,रा.अविनाशनगर,एमआयडीसी) यास सागर बेळमकर,दादा भोसले,अनिल शिंदे,समर्थ बेळमकर,प्रेम राठोड,विनायक वेणुगुंडला यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच फिर्यादीच्या डोळ्यात हातातील कड्याने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या दोन्ही घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक

चौधरी हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments