Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

निंबर्गी येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेची चोरी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील इंदिरानगर येथे भर दिवसा चोरीची घटना घडली.या घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली आहे.ही घटना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता घडली.सिद्धाराम व्हनप्पा आयवळे (वय वर्षे ६५,रा.इंदिरानगर,निंबर्गी,ता.द.सोलापूर) यांनी दिलेल्या

फिर्यादीनुसार गणेश गाडीवडार (वय वर्षे ३५,रा.माळकवठे,ता.द.सोलापूर) या चोरट्याविरोधात मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मंद्रूप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे घरातील सकाळची कामे करीत होते.याचवेळी गावातील गणेश

गाडीवडार हा घराजवळ आला.फिर्यादी हे कामात व्यस्त असल्याचे पाहून घरात शिरून घरातील लोखंडी कपाट उघडून कपाटातील २० हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी,२० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण,५० हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.या घटनेची नोंद मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस हवालदार मुलाणी हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments