मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
मंद्रूप येथील श्री महात्मा बसवेश्वर गणेश उत्सव तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच श्री गणरायाची विधिवत पूजा संपन्न झाली.
यावेळी मंद्रूप पोलीस स्टेशनचे उपअधीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, दक्षिण सोलापूर पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, शिवराज काळे, मंडळाचे अध्यक्ष उमेश हेळकर, उपाध्यक्ष प्रशांत जोडमोटे, माळाप्पा घाले पत्रकार शिवराज मुगळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाचे कौतुक करण्यात आले. उत्सव काळात सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.







0 Comments