Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलिस ठाणे हद्दीत दोन गंभीर गुन्हे; अल्पवयीन मुलीला मारहाण, तर शेतवस्तीवर ₹6.10 लाखांची दरोडासदृश चोरी...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

मंद्रूप पोलिस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या गंभीर घटना घडल्या असून, एका प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला दोरी लावून फरफटत नेल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या घटनेत शेतवस्तीवरील दोन घरांमध्ये घुसून चाकू, काठी व सळईचा धाक दाखवत तब्बल ₹6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

अंत्रोळी येथील घटनेत चौघांविरुद्ध गुन्हा

अंत्रोळी येथे 13 सप्टेंबर रोजी शेताच्या बांधावर नांगर मारण्याच्या कारणावरून वाद झाला. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून नेताजी शिवाजी थोरात, तानाजी शिवाजी थोरात, महानंदा शिवाजी थोरात आणि वर्षा नेताजी थोरात यांच्याविरुद्ध मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 389/2026 नुसार BNS कलम 109(1), 74, 76, 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) तसेच POCSO कायद्यानुसार कलम 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तिची आजी फुलाबाई थोरात व चुलत भाऊ कार्तिक थोरात हे शेताच्या बांधाजवळ नांगर मारू नका, असे सांगण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर कार्तिकला ट्रॅक्टरमधील दोरीने गळा आवळून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फिर्यादी त्यांना सोडवण्यासाठी गेली असता तिच्याही गळ्याला दोरी लावून फरफटत नेण्यात आले व तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि करंडे करीत आहेत. आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत.

कंदलगावमध्ये शेतवस्तीवर चार अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

दरम्यान, कंदलगाव येथे 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी शेतातील दोन घरांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून रहिवाशांना मारहाण केली. चाकू, काठी व सळईचा वापर करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल चोरीस नेल्याची घटना घडली.

महादेवी गौरप्पा कोरे यांच्या फिर्यादीवरून मंद्रूप पोलिस ठाण्यात गु.र.नं. 390/2026, BNS कलम 309(6) अन्वये चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महादेवी कोरे यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून ₹2 लाख 48 हजार, तर रेवप्पा बुद्धाप्पा घोडके यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून ₹3 लाख 62 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे करीत आहेत. आरोपी अद्याप अज्ञात असून कोणालाही अटक झालेली नाही.

दोन्ही घटनांचा तपास परि. पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलिसांकडून सुरू आहे.


Post a Comment

0 Comments