Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आई रागावल्याने तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील तरुणाने आई रागावल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना सोमवार,दि. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.शांतलिंग गुरुलिंगय्या स्वामी (वय वर्षे १७,रा.निंबर्गी,ता.दक्षिण सोलापूर ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,शांतलिंग स्वामी याचे आई-वडील शेतमजुरी करतात.घरकुल मंजूर झाल्याने त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे स्वामी कुटुंबीय शेजारील बसवराज कोळी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात.मुलगा शांतलिंग आजारी असल्याने त्याला आईने रागावून दवाखान्याला जाण्यास सांगितले.मात्र मी दवाखान्यात जाणार नाही.मी आंघोळीला बाहेर जातो म्हणून तो रागा-रागाने घरातून निघून गेला.उशीर झाला तरी शांतलिंग परत न आल्याने आईने मोठा मुलगा बसवराज याला फोन करून सांगितले.त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता जवळच असलेल्या मल्लिकार्जुन शेतसंदी यांच्या जुन्या घरात तो नायलॉन दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला.बसवराजने ओरडून आईला बोलावले.त्यानंतर आई,आजी व इतरांनी गळफास सोडवून खाली उतरविले.तातडीने मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.मंद्रूप पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments