दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील रुहिवाशी महेश नडगिरी यांच्या घरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ५ फुटी विषारी नाग आढळला.महेश नडगिरी यांनी प्रसंगावधान राखत दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुप्रसिध्द सर्पमित्र मधुकर राठोड यांना तात्काळ फोन करुन यासंदर्भात कल्पना दिली.सर्पमित्र मधूकर राठोड यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन सदर विषारी नागाला अत्यंत शिताफीने आपल्या ताब्यात घेतले आणि निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले.साप दिसताक्षणी त्याला न मारता तज्ञ सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....
0 Comments