मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे गुरुवारी पहाटे सोलापूर जिल्हा सहकारी बँकेसह चार दुकाने व दोन घरे चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे.बँकेच्या समोर लावलेली इम्रान तांबोळी यांची दुचाकी त्याचा क्रमांक एमएच 13 सीसी 0573 ही दुचाकी पळवली.
दरम्यान अज्ञात चोरट्याने बँकेचा दरवाजा तोडून कपाट तोडण्याचा प्रयत्न केला.यावेळी तिजोरीला हात न लावल्याने सायरन वाजला नाही.अन्य दोन दुकाने व दोन घरे व एक मोटरसायकल सह दुकानातील अंदाजे रक्कम २० हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे .
या घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे सह पो.का.नाईकवाडे,पो.कॉ.कासले,पो.कॉ.माने हे पहाटेच घटनास्थळी दाखल झाले.गुरुवारी सकाळी कामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक सकाळी ९ वाजता उपस्थित होते.परंतु चोरट्यांची कोणतीही वस्तु न सापडल्याने शोध घेता आले नसल्याचे सांगण्यात आले.अधिक तपास कामती पोलीस करीत आहेत.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....
0 Comments