Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली? लोकायुक्त निर्देशांवरील कारवाई अद्याप रखडली... दीड-दोन वर्षांपासून आदेशाची अंमलबजावणी नाही; पाठपुराव्यानंतरही संबंधित यंत्रणा मौन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका प्रकरणात लोकायुक्तांच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, आदेशाला तब्बल दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

संबंधित प्रकरणात वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाहीला गती मिळत नसल्याने आदेशाची अंमलबजावणी नेमकी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही प्रकरण प्रलंबित ठेवण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही संबंधित कार्यालयाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास त्यामागील कारणे काय, तसेच जबाबदारी निश्चित होणार का, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना अशा प्रकारची दिरंगाई गंभीर मानली जात आहे.

या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि विलंबास जबाबदार असलेल्या बाबींची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

यासंबंधी पुराव्यासह सविस्तर माहिती बातमीच्या पुढील भागात पाहूया.



Post a Comment

0 Comments