Advertisement

Breaking News
Loading...

शिरपनहळ्ळी येथे राजकीय वादातून दोघांना लाथाबुक्याने मारहाण



फिर्यादी प्रथमेश केदार कारंजे (वय 22),राहणार शिरपनहळ्ळी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.22 आँक्टोबर 2023 रोजी सकाळी 11/30 वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळ्ळी येथील शिवशक्ती मंदीराजवळ फिर्यादीचा मित्र मेघराज बिराजदार याने पिंटु बिराजदार याला तुला आम्ही अडीच वर्षाकरीता उपसरपंच केले.तुझे अडीच वर्षे पूर्ण झाले आहे.आत्ता दुस-याला चान्स द्या असे म्हणाला.त्याचा राग येवून भैरवनाथ गुरुसिध्द बिराजदार याने लाकडाने फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले.पिंटु बिराजदार,कुमार बिराजदार यानी फिर्यादीला व मेघराज यास शिवीगाळी दमदाटी करुन लाथाबुक्याने मारहाण केली आहे.म्हणून सदर आरोपी विरुध्द वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक बंदीछोडे हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments