Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

किरकोळ कारणावरुन एकाला लोखंडी गजाने केली मारहाण

फिर्यादी उत्तम यशवंत मुळे (वय 55),राहणार माने वस्ती,खंडाळी,तालुका मोहोळ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 22 आँक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी खंडाळी गावातील मारुती मंदिरात बसले होते.त्यावेळी बाळू बाबू मुळे,शुभम बाळू मुळे,सागर मधुकर मुळे,शेखर मधुकर मुळे,सर्वजण राहणार खंडाळी,तालुका मोहोळ यांनी मंदिरात येऊन दिपाली मुळे हिला चिंचेची झाडे का तोडली असा जाब विचारण्या करिता आमच्याकडे तूच तिला पाठवून दिले आहे.असे म्हणून शिवीगाळ करु लागले.तू आमचे काहीही करू शकत नाही म्हणून फिर्यादीला बाळू बाबू मुळे,सागर मधुकर मुळे,शेखर मधुकर मुळे यांनी खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण करू लागले.शुभम बाबू मुळे यांनी त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात कपाळावर मारून जखमी केले.म्हणून चारही आरोपींवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार क्षीरसागर हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments