Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदणी येथील आरटीओ चेक पोस्ट जवळ पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरने दिलेल्या धडकेत ५ जण गंभीर जखमी ; जीवितहानी नाही

 नांदणी येथील आरटीओ चेक पोस्ट जवळ पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरने दिलेल्या धडकेत ५ जण गंभीर जखमी ; जीवितहानी नाही


दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील आरटीओ चेकपोस्ट जवळ पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरची धडक बसल्याने पाच जण गंभीर जखमी झाले.कौशल्य आक्रुड मंदे( वय वर्ष 30),पार्वती विभीषण मंदे (वय वर्षे ४०),प्रदीप सुर गुंड (वय वर्ष 30),विजयकुमार मठपती (वय वर्ष 30),छबुराव मंदे (वय वर्ष 45),सर्वजण राहणार जहाँगीर मोहा,तालुका धारूर,जिल्हा बीड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.यातील जखमी हे जमखंडीहून बीड कडे क्रुझर वाहनातून आपल्या गावाकडे निघाले होते.नांदणी येथील आरटीओ चेक पोस्ट जवळ येताच पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरची धडक बसली.हा अपघात बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.अपघाताच्या ठिकाणी निंबर्गीचे विद्यमान उपसरपंच पिरसाहेब हवालदार,सुभाष नानाजे,नांदणी टोळनाका 1033 च्या कर्मचार्‍यांनी तत्परता दाखवत अपघातातील जखमींना मदत केले.सर्व जखमींना 108 ॲम्बुलन्सने डॉक्टर संदीप चव्हाण यांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दाखल केले.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.जखमी पाचही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments