कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार चंद्रकांत सुतार यांना वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक...
49 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 या स्पर्धेत सोलापूर शहराच्या वतीने
102 किलो वजनी गटामध्ये मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार चंद्रकांत सुतार यांनी एकूण 200 किलो वजन उचलून वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपद पटकावले आहे.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मंद्रूप पोलीस दलाची मान उंचावली आहे.
पोलीस अमलदार चंद्रकांत सुतार यांनी सुवर्णपदक पटकावून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्यासह मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रशांत हुले,पोलीस कर्मचारी मित्र परिवारासह नातेवाईक आदींनी कौतुक केले आहे.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

1 Comments
Very nice sir
ReplyDelete