Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ शासकीय गोडाऊन येथील जप्त केलेले दोन हायवा टिपर पळवून नेणाऱ्या 7 जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

 मोहोळ शासकीय गोडाऊन येथील जप्त केलेले दोन हायवा टिपर पळवून नेणाऱ्या 7 जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

फिर्यादी कोतवाल गणेश मच्छिंद्र पवार (वय 40),रा.वडवळ,ता.मोहोळ यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ तहसीलदारांच्या पथकाने गौण खनिज वाळुची देखरेख करण्याकामी शासकिय धान्य गोडावुन मोहोळ येथे फिर्यादी सोबत कोतवाल महेश दत्ता काळे,रा.चिंचोलीकाटी,ता.मोहोळ यांची नेमणुक केली होती.सदर ठिकाणी दि.30 जानेवारी 2024 रोजी रात्री अडीच वा.सु.सरकारी कामात अडथळा करून,दोघांना शिवीगाळ,दमदाटी करून मोहोळ येथील शासकीय गोडावुन मध्ये लावलेले दोन हायवा टीपर त्यांचा क्र 1) MH 17 BY 9835 व 2) MH 46 AF 1973 या गाड्या दोघांच्याही हाताला धरून,शिवीगाळ,दमदाटी करून जबरदस्तीने पळवुन घेवुन गेले आहेत. म्हणुन आरोपी समाधान चव्हाण रा.शेगाव दुमाला,तालुका पंढरपूर व त्याच्या सोबत असलेले अनोळखी सहा इसमाविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मसपोनि फाळके या करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments