Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

वांगी येथे टेम्योमध्ये दाटीवाटीने 3 जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या चालकासह दोघांवर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल

 वांगी येथे टेम्योमध्ये दाटीवाटीने 3 जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या चालकासह दोघांवर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल



दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे टेम्योमध्ये दाटीवाटीने 3 जनावरांची वाहतूक करणार्‍या चालकासह दोघांवर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.कॉ.राजकुमार जिराळ यांनी मंद्रुप पोलीसात याबाबत फिर्याद दिली आहे. मंद्रूप पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. 6 एप्रिल 2024 रोजी सायं. साडेसहा वाजेच्या सुमारास अशोक लेलॅन्ड कंपनीचा टॅम्पो त्याचा क्रं.एम.एच.13.डी.क्यु.4608 च्या टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो मध्ये दाटीवाटीने 3 जनावरे रस्सीने बांधुन वडकबाळ ते वांगी रोडने वाहतुक करीत असताना वांगी येथे मिळुन आला. टेम्पोतील जनावरांना क्रूरतेची वागणुक दिली. म्हणुन टेम्पो चालक राजशेखर विठठल माळी, रा. सोरेगांव, सोलापूर व त्याच्या सोबत असलेले परशुराम मारूती सुर्यवंशी, रा. वडकबाळ, ता. द. सोलापूर, दयानंद बहीरप्पा म्हेत्रे, रा. सोरेगांव यांच्या विरुदध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये मंद्रूप पोलीस ठाण्यात दि. 7 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून 2 लाख रुपये किंमतीची पांढ-या रंगाची अशोक लेलॅन्ड कंपनीचा टॅम्पो, 20 हजार रु. किंमतीची एक पांढ-या रंगाची गाय, 6 हजार रुपये किंमतीची 2 गायीची कालवडे असा एकुण 2 लाख 26 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास मंद्रुप पोलीस करीत असल्याची माहिती मंद्रूप पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल




Post a Comment

0 Comments