Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

वाघोली ब्रिजवर हयगयीने कार चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकावर कामती पोलिसात गुन्हा दाखल

वाघोली ब्रिजवर हयगयीने कार चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकावर कामती पोलिसात गुन्हा दाखल




अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ईरटीका कार त्याचा क्रमांक MH 13 DY 9909 हयगयीने भरधाव वेगात चालवून मोटरसायकल त्याचा क्र. MH 13 CE 8810 चा चालक हरी विठ्ठल जगताप (वय 50), रा. सोहाळे, ता. मोहोळ यास पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत हरी जगताप हे गंभीर जखमी होऊन त्यांंचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तसेच कारमध्ये बसलेले विकी लोणार यांना जखमी करणे व दोन्ही वाहनाचे नुकसान होण्यास कारणीभूत होऊन अपघाताची माहिती न देता तसाच निघून गेला आहे. ही घटना सोलापूर- मंगळवेढा जाणार्‍या हायवे रोडवरील वाघोली येथील ब्रिजवर दि. 4 एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. अजित महादेव जगताप (वय 31) यांनी कामती पोलीसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चालकावर कामती पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कामती पोलीस करीत असल्याची माहिती कामती पोलीसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments