Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अंत्रोळी येथे वडिलांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून मुलासह मेव्हणा निर्दोष; ॲड.मिलिंद थोबडे यांची माहिती

 अंत्रोळी येथे वडिलांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून मुलासह मेव्हणा निर्दोष; ॲड.मिलिंद थोबडे यांची माहिती



शिवाजी बलभीम थोरात,वय 55, रा. थोरात वस्ती, अंत्रोळी, ता.द. सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी मुलगा तानाजी शिवाजी थोरात, वय 28 रा. थोरात वस्ती,अंत्रोळी तसेच मेव्हणा भीमराव रामचंद्र जाधव रा. कंदलगाव, ता. द.सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर होऊन गुन्हा शाबित न झाल्याने त्यांनी दोन्ही आरोपींची मंगळवार, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास निर्दोष मुक्तता केली.


या हकीकत अशी की, दि. 13/8/2022 रोजी मयत शिवाजी याने त्याची पत्नी महानंदा हिस कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले होते, त्याचा राग मनात धरून आरोपी तानाजी याने मयतास घरासमोरील नारळाच्या झाडाला दोरीने बांधून काठीने मारहाण केली होती. त्यानंतर मयताच्या पत्नीच्या भावाने परत येऊन मयतास काठीने मारहाण केली होती. त्यातच तो मयत झाला.त्यानंतर आरोपी तानाजी थोरात याने त्याचे वडील हे मोटरसायकल वरून पडून मयत झाल्याची खबर देखील पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनेबाबत तपास केला असता आरोपी तानाजी याने दिलेली खबर ही खोटी असून आरोपी तानाजी व त्याचा मामा भीमराव यांनीच मयत शिवाजी यास काठीने मारून जीवे ठार मारले असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावर तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात मयतास जीवे ठार मारण्याचा कोणताही हेतू व उद्देश शाबीत झाला नाही, त्यामुळे आरोपींनी गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. मिलिंद थोबडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.


यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. निशांत लोंढे, ॲड. अमित सावळगी यांनी तर सरकारतर्फे ॲड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट




Post a Comment

0 Comments