Advertisement

Breaking News
Loading...

अकोले मंद्रूप येथे बारावीचा पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात तरुणाने पिले युरियाचे पाणी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु

 अकोले मंद्रूप येथे बारावीचा पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात तरुणाने पिले युरियाचे पाणी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु


दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रूप येथे इयत्ता बारावी परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात विठ्ठल रामचंद्र पाटील (वय 18, रा. अकोले मंद्रूप, ता. द. सोलापूर) या तरुणाने युरिया खताचे पाणी पिले. ही घटना शनिवार, दि. 13 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली. तदनंतर त्याला त्रास होऊ लागल्याने त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी भाऊ राज पाटील याने सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल व्हाॅस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलीसांकडून सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments