Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन


महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते सोलापुरातील सुपर बझार येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, टजिल्हाध्यक्ष युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा सहसचिव राजदत्त रासोलगिकर, नागेश सातपुते, राम गायकवाड, यशपाल आखाडे, सुशिलचंद्र भालशंकर, अभिजीत भंडारे, संजय कदम, नीलकंठ अय्यर, सत्यवान पाचकुडवे, विनोद वर, भारत कापरे, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर धांडे, महादेव माने, शिवाजी खारे, अशोक कांबळे, एकनाथ रिकिबे, प्रकाश कांबळे

आदी महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी राम गायकवाड, बोधीप्रकाश गायकवाड, अण्णासाहेब भालशंकर, युवराज भोसले, प्रकाश शिंदे आदींनी आपले विचार व्यक्त केले.


प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले तर युवराज भोसले यांनी आभार मा



नले.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

 बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments