सकल कोळी महादेव-मल्हार कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना मनोबल दिले व पाठिंबा जाहीर केला.
या पार्श्वभूमीवर धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
शरद कोळी म्हणाले की,
> “कोळी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही शांत
तेच्या मार्गाने लढा देत आहोत. या लढ्यात प्रणिती ताई शिंदे यांनी दाखवलेला सहभाग आणि पाठिंबा हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय भेद बाजूला ठेवून त्यांनी केलेली ही साथ कौतुकास्पद आहे. अशा संवेदनशील नेतृत्वामुळे समाजाचा विश्वास वाढतो.”
शरद कोळी यांनी पुढे असेही सांगितले की,
> “सरकारने तातडीने आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल.”

0 Comments