सोलापूर (हॅलो रिपोर्टर प्रतिनिधी) – संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला असून महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण जाहीर झाले आहे.
🔹 अनुसूचित जाती आरक्षण:
अनुसूचित जाती प्रवर्गातील 15 जागांपैकी 8 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
त्या म्हणजे – प्रभाग 25, 13, 15, 4, 6, 21, 26, 17.
या आरक्षणामुळे माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नूतन गायकवाड, वंदना गायकवाड यांना फायदा झाला असून,
तर शिवसेना नेते मनोज शेजवाळ, शिवा बाटलीवाला, सुभाष शेजवाळ यांच्या संधींवर गंडांतर आले आहे.
🔹 अनुसूचित जमाती आरक्षण:
अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील दोन जागांपैकी प्रभाग 24 महिला आरक्षित झाला आहे.
यामुळे माजी उपमहापौर राजेश काळे यांना मोठा धक्का बसला.
ही जागा आरक्षित होताच त्यांनी नाराज चेहऱ्याने सभागृह सोडले.
🔹 ना.मा.प्र. (OBC) आरक्षण:
ना.मा.प्र. प्रवर्गातील प्रभाग 14 आणि 18 हे थेट OBC महिला राखीव झाले आहेत.
तसेच प्रभाग 1, 2, 5, 16, 22, 23 या जागा थेट OBC महिला राखीव झाल्या, तर सोडतीतून प्रभाग 9, 12, 3, 8, 11, 7 हे देखील OBC महिला राखीव झाले.
🔹 सर्वसाधारण प्रवर्ग:
सर्वसाधारण (General) प्रवर्गातील 58 जागांपैकी 28 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. महिलांचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी या जागांचे वाटप थेट करण्यात आले असून त्यासाठी वेगळी सोडत काढण्यात आली नाही.
⚖️ परिणाम आणि राजकीय चित्र:
या आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष नेत्यांचे समीकरण बिघडले आहे. विशेषतः राजेश काळे, मनोज शेजवाळ, प्रवीण निकाळजे यांसारख्या नेत्यांना नव्या प्रभागातून मार्ग शोधावा लागणार आहे. महिलांसाठी मात्र ही संधी सोन्याची ठरत असून, आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

0 Comments