मुंबई प्रतिनिधी: माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या गटाचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश प्रथमेश दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडला. या प्रवेश सोहळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री मा. जयकुमार भाऊ गोरे आणि आमदार मा. देवेंद्र दादा कोठे, माजी नगरसेवक गुरुशांतदादा धुत्तरगावकर आदी उपस्थित होते.
या वेळी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, माजी नगरसेविका मीरा गुर्रम, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, तसेच संतोष सोमा, वासु यलदंडी, दिनेश गुर्रम, आकाश भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, पालकमंत्री जयकुमार गोरे व थोरले बंधू आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रथमेश महेश कोठे यांनी सांगितले. “आजोबा स्व. विष्णुपंत तात्या कोठे आणि वडील स्व. महेश अण्णा कोठे यांनी केलेले सामाजिक व राजकीय कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आमचा कोठे परिवार पुन्हा राजकारणात एकत्र आल्याचा मला आनंद आहे,” असेही ते म्हणाले.



0 Comments