पंढरपूर (हॅलो रिपोर्टर प्रतिनिधी):
आज कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेची महापूजा करून राज्याच्या जनतेसाठी सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंदिर परिसरात “जय जय रामकृष्ण हरी!” या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते.
भक्तांच्या गर्दीत उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शनानंतर भाविकांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या व “भक्ती, एकता आणि समाजसेवेचा हा संदेश कायम ठेवूया” असे आवाहन केले.


0 Comments