Advertisement

Breaking News
Loading...

निंबर्गी पंचायत समिती गणातून एस.सी. महिला गटात यशोदा अरविंद दुपारगुडे यांची इच्छुक उमेदवारी...

 

निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) : आगामी पंचायत समिती निवडणुकीत निंबर्गी पंचायत समिती गणातील अनुसूचित जाती महिला गटातून यशोदा अरविंद दुपारगुडे यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.


यशोदा दुपारगुडे या माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा कार्यकर्ते अरविंद दुपारगुडे यांच्या पत्नी आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून स्थानिक विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.


निंबर्गीचे माजी सरपंच भारत बिराजदार आणि उद्योजक सोमशंकर बिराजदार यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. स्थानिक पातळीवर त्या महिलांच्या स्वावलंबन, शिक्षण आणि आरोग्यविषयक उपक्रमांत सक्रिय असल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे.


आगामी निवडणुकीत भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments