Advertisement

Breaking News
Loading...

अनगर नगरपंचायतीत ‘१७ पैकी १७’ भाजपाचे बिनविरोध यश; माजी आमदार राजन पाटील यांचा आरिफ शेख मित्र परिवारा तर्फे सत्कार...

 


अनगर (प्रतिनिधी):

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत इतिहास रचत भारतीय जनता पक्षाने सर्व १७ पैकी १७ नगरसेवक आणि नगराध्यक्षपद बिनविरोध जिंकत भक्कम विजयी कामगिरी केली. महाराष्ट्रातील अशी पहिलीच नगरपंचायत ठरल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजनजी पाटील यांचा आरिफ शेख मित्र परिवार, मंद्रूप यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमात राजनजी पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. नगरपंचायत बिनविरोध करण्यामागील त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांचा विश्वास याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.



या प्रसंगी नौशाद शेख, तानाजी गुंड, बबन शेख, अनुप पंडीत, दाजी रणफीशे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नगरपंचायतीच्या पुढील विकास आराखड्यावरही चर्चा झाली. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास, डिजिटल सेवा आणि नागरिकांपर्यंत जलद प्रशासन पोहोचवण्यावर विशेष भर देण्याचा संकल्पही व्यक्त झाला.



राजन पाटील यांनी या बिनविरोध निवडणुकीचे श्रेय भाजपच्या तळागाळातील कार्यकर्ते, नागरिकांचा विश्वास आणि सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला दिले. त्यांनी नागरी विकासाच्या कामांना गती देण्याचे आश्वासनही दिले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरिफ शेख यांनी केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी आमदारांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments