दक्षिण सोलापूर प्रतिनिधी: दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ते व पदाधिकारींच्या बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा सत्र घेण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव अकबर शेख यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार आणि तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्यासमोर तालुक्यातील राजकीय परिस्थिती मांडत मंद्रुप जिल्हा परिषद गटातून महमद शेख यांच्या कुटुंबाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
अकबर शेख म्हणाले, “महमद शेख हे पक्षाचे निष्ठावंत आणि सर्वसमावेशक कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेहमी आवाज उठवला असून सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे. अल्पसंख्याक समाजातील हे एक उच्चशिक्षित कार्यकर्ते असून त्यांनी इतिहास आणि पत्रकारिता या विषयात एम.ए. पदवी घेतली आहे.”
ते पुढे म्हणाले, “महमद शेख हे काँग्रेस विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. सदस्य नोंदणी मोहिमेत त्यांनी मंद्रुप व आसपासच्या गावांतील सर्वाधिक सदस्य नोंदवले. ते पत्रकार असल्याने त्यांचा तालुक्यातील प्रत्येक गावाशी थेट संपर्क आहे.”
सदर गटात यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने, महमद शेख यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
या बैठकीला काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी उपस्थित राहून सांगितले की, “महमद सारख्या तळमळीने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी.”
बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, अँड. संजय गायकवाड, सिकंदरताज पाटील, राधाकृष्ण पाटील, धर्मराज पुजारी, मोतीराम चव्हाण, अस्लम शेख, अनंत म्हेत्रे, मौलाली शेख, अमीर शेख, अशोक देवकते, गेनसिद्ध मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments