Advertisement

Breaking News
Loading...

🟣 ब्रेकिंग न्यूज: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी..!

आजपासून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील हप्ता जमा होण्यास सुरुवात



सोलापूर प्रतिनिधी:

राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी जमा करण्यास आजपासून सुरुवात झाली असून, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये निधी टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे.


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असून सर्व पात्र बहिणींना लवकरच रक्कम मिळणार आहे.


त्याचबरोबर, ज्यांनी अद्याप E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपूर्वी ती अनिवार्यपणे पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments