Advertisement

Breaking News
Loading...

भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार आणि अनाथ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न... गुणवंताना शिष्यवृत्ती प्रेरणादायी: कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे...

 


सोलापूर, दि.२७- हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:  आईवडिलांची सेवा देवपूजेपेक्षाही सर्वश्रेष्ठ असून  शिक्षणामुळे प्रगतीची दारी खुली होतात. त्यामुळेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे गरजेचे असते. आईवडिलांची सेवा करण्याबरोबरच निराधार विद्यार्थ्यांचे शिक्षण करणे   या पार्श्वभूमीवर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा विचार कौतुकास्पद असून हा विचार आणखीन प्रभाविपणे प्रसारित झाला तर समाजातील गरजूंना मदतीचा हात मिळणार आहे.असे सांगून गुणवंतांना शिष्यवृत्ती वाटपाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.


नामदेवराव भालशंकर यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव (बापू) बंडूजी भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती तसेच संविधान गौरव परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी मंचकावर मातोश्री रुक्मिणी भालशंकर, प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते, शिक्षण विभाग वेतन व भ. नि.नि. पथकाचे जिल्हा अधीक्षक लक्ष्मण बालवाड, सागर अंबूरे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, समता सैनिक दलाच्या जिओसी सुमित्रा जाधव, नानासाहेब भांलशंकर, गौरव समितीचे सचिव प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतल्यानंतर दिवंगत रुक्मिणी गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर 12 पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच निराधार गरजू , दत्तक विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण केल्यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या संविधान गौरव परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना भरघोस रकमेचे धनादेश, पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.


अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, "आपण प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे, सेवा करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे तितकेच आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी मुलांचे शिक्षण थांबू नये; कारण शिक्षणामुळेच पुढची पिढी घडते व समाज प्रगत होतो", असे विचार व्यक्त केले.


सत्कार मूर्तींच्यावतीने आनंद जाधव(मुंबई), युवराज पवार, चंदाताई कासले(मुंबई), दिलीपराव चौगुले, डॉ.क्रांती खंडागळे (अमेरिका)यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. बापूसाहेब आडसूळ, सुमित्रा जाधव यांचेही मनोगत झाले. या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्री करनिरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्रा. युवराज भोसले यांनी केले तर शिवाजी जगताप यांनी आभार मानले.


हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर, प्रफुल्ल जानराव, मिलिंद भालशंकर, प्रकाश साळवे, महेश मेंडके, विष्णू लादे, सिद्धेश्वर भुरले, कैलास माने, सत्यवान पाचकुडवे, विनोद वर, शिवानंद चौगुले आदींनी परिश्रम घेतले.


" याप्रसंगी चिमुकल्यांनी नामदेवराव भालशंकर यांच्या पूर्व आयुष्यावर आधारित नातवांनी वास्तववादी लघुनाटिका सादर केली. या लघुनाटिकेला सभागृहातील उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी चिमुकल्यांचे मनोबल उंचावले. नामदेवराव भालशंकर यांच्या जीवनप्रवासातून शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले'.




Post a Comment

0 Comments