Advertisement

Breaking News
Loading...

पंढरपूर तालुक्यातील ६ सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कडक कारवाई...

 


पंढरपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरोधात सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने मोठी प्रतिबंधक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये पंढरपूर तालुक्यातील ६ सराईत गुन्हेगारांना १ वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.


पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सुनावणी करून मा. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी हद्दपारीचे आदेश दिले.


तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये


१) रोंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे,

२) दर्शन उर्फ कौस्तुभ संतोष बंडगरे,

३) ओम उर्फ ओके गणेश जाधव (कोळी),

४) अक्षय हरीभाऊ गवळी उर्फ अक्षय जुमाळे,

५) कार्तिक नागेश सुरवसे,

६) पवन अनिल आधटराव

(सर्व रा. पंढरपूर, ता. पंढरपूर) यांचा समावेश आहे.


या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, घातक हत्यार बाळगून दहशत माजवणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असून संघटितपणे व वैयक्तिक स्वरूपात गुन्हे करून त्यांनी सामाजिक शांतता बिघडवली होती.


नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, हद्दपार करण्यात आलेले इसम जिल्ह्यात आढळल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


यापुढेही दोन किंवा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


ही कारवाई मा. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा. प्रशांत डगळे, सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्यासह पंढरपूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment

0 Comments