Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा...! 102 पैकी बहुसंख्य जागांवर भाजपचा दणदणीत विजय...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:

सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) स्वबळावर सत्ता काबीज करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 52 जागांचा टप्पा भाजपने सहज पार करत महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे.

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल हाती येत असताना सोलापूर महापालिकेच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते. भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि माकप यांनी एकत्रित आघाडी केली होती. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजप विरुद्ध सर्व पक्ष असा थेट सामना भाजपने आपल्या बाजूने वळवला.

भाजपचा एकतर्फी विजय:

सोलापूर शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 13, तसेच 15, 17 ते 26 या बहुतांश प्रभागांमध्ये भाजपचे वर्चस्व दिसून आले. अनेक प्रभागांत भाजपने चारही जागा जिंकत क्लीन स्वीप केला आहे.

MIM आणि इतर पक्षांनाही प्रतिनिधित्व:

प्रभाग क्रमांक 14 आणि 20 मध्ये MIM ने आपले वर्चस्व राखले आहे.

तर काही मोजक्या प्रभागांमध्ये काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना यश मिळाले आहे. मात्र संख्याबळाच्या दृष्टीने हे यश मर्यादित ठरले आहे.

सोलापूरमध्ये भाजपची सत्ता पक्की:

या निकालानंतर सोलापूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता निश्चित झाली असून, शहराच्या आगामी विकासकामांवर भाजपचे नेतृत्व राहणार आहे. लवकरच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments