🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!
यशवंत व्हा... गुणवंत व्हा.... कीर्तीवंत व्हा... स्थायी समितीचे चेअरमन व्हा...
यहाँ के हम है सिकंदर...
सोलापूर महानगरपालिकेतील वडार समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक विनायक (अण्णा) विटकर आणि नगरसेविका मातोश्री कादंबरी मंजेली, अंबिका (वहिनी) चौगुले तसेच पिंपरी- चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राहुल (दादा) भोसले हे निवडून आले निमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा...!
▶️ विनायक (अण्णा) विटकर
'आव्वाज कुणाचा...' म्हटल्यावर मागून तरुणांचा दमदार आवाज ऐकू येण्याचे दिवस केव्हाच गेले. आपल्यापासून दूर राहणारा, महागड्या दोन-चार मोबाईलवर बोलत अनेक प्रकारच्या आलिशान गाड्यांमधून फिरणारा नेता तरुणाईला नकोय. त्यांना नेता हवाय समस्या जाणून घेणारा. हाच सूर सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक चार चे तरुण तडफदार नगरसेवक विनायक (अण्णा) विटकर या युवा नेत्याने कधीचाच ओळखला. सर्वसामान्यांचा असामान्य नेता, कर्तुत्वान, प्रतिभावान, स्वतंत्र प्रतिमेचे नेतृत्व लाभलेले... विनायक (अण्णा) विटकर हे प्रभाग क्रमांक चार मधून दुसऱ्यांदा भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...
▶️ मातोश्री कादंबरी मंजेली...
नुसताच आवाज चढवून भाषण करणे योग्य नाही, तर आपल्या भाषणातून विचार गेले पाहिजेत. आवाजाची उंची नाही, तर विचारांची उंची वाढली पाहिजे. या दृष्टिकोनातून मातोश्री कादंबरी मंजेली यांनी केलेले अभ्यासपूर्ण आवाहन नागरिकांना चांगलीच भावली आणि पहिल्या प्रयत्नातच त्या प्रभाग क्रमांक नऊ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. या विजयात मातोश्री कादंबरी यांचे सुपुत्र *सिद्धार्थ* यांनी राजकारणात यशस्वी होण्यासाठी लोकहिताचे कामे करणे आवश्यक आहे. जनसंपर्क कायम ठेवणारा व त्यांची कामे करणाराच राजकारणात टिकून राहतो व यशस्वी होतो हे सिद्ध करून दाखवले आहे.
▶️ अंबिका ( वहिनी) चौगुले..
प्रभाग क्रमांक 13 च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन.. अंबिका (वहिनी) चौगुले यांनी राजकीय श्रीगणेश केला. सुरुवातीला काहींनी महिला म्हणून आश्चर्य व्यक्त केले, पण कर्तुत्व, नेतृत्व व प्रचंड संयम या गुणांनी टीकाकारांची तोंडे या अंबिका वहिनींनी कायमची बंद केली. कर्तुत्वान, प्रतिभावान, कृतिशील विचारांचा, निगर्वी अशी विशेषण ज्यांना देता येईल त्या अंबिका वहिनी चौगुले याही पहिल्याच प्रयत्नात नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. अर्थात विजयात.. सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन तथा मी वडार महाराष्ट्राचा... या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर अण्णा चौगुले यांचा सिंहाचा वाटा आहे. अण्णांचे व्यक्तिमत्व म्हणजे लोहचुंबकासारखे आहे. सामाजिक जीवनात काम करताना सर्वांना सांभाळून घेणे मदतीला अडीअडचणीला धावून जाणे हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा पैलू. त्यामुळेच स्वपक्षीय तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेतेमंडळीबरोबर त्यांचे संबंध चांगले असल्याने अंबिका वहिनीनी नगरसेविका हे पद स्वतःकडे खेचून आणली. याशिवाय या तिघांना निवडून आणण्यासाठी आमदार देवेंद्र दादा कोठे, आमदार विजयकुमार देशमुख मालक, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवली.
▶️ राहुल (दादा) भोसले...
पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकेत राहुल (दादा) भोसले हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राहुल दादांनी यापूर्वी नगरसेवक असताना.. नगरसेवक केवळ प्रभागातील कामे करतात ही प्रतिमा कामातून बदलली. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शंभर टक्के योगदान द्यावे लागते. समोरच्या व्यक्तीला त्याचे काम नगरसेवकांनी करावे ही अपेक्षा असते. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याच्या माफक अपेक्षेला खरा उतरल्यानेच लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला आहे. राहुल दादांनी केवळ फोनवरून नागरिकांची असंख्य कामे मार्गी लावल्यानेच मतदारांना राहुल दादा हे जवळचे विश्वासू वाटले. शेवटी दांडगा जनसंपर्क हाच राजकारणातील यशाचा आत्मा आहे. हे राहुल दादांनी तंत्र वापरले आणि प्रचंड मताधिक्यांनी तिसऱ्यांदा निवडून आले.
या चारही उमेदवारांनी आपल्या प्रभागात घासून नाही तर ठासून प्रचंड मताधिक्यांनी दणदणीत विजय मिळवत एक प्रकारे 'यहाँ के हम है सिकंदर' असल्याचे दाखवून दिले आहे.





0 Comments