बोरामणी | दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होत, शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या मार्गदर्शनाखाली बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीश्रीश्री जगद्गुरू १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी (काशीपीठ) यांच्या आशीर्वादाने होणार असून, कार्यक्रमाला मा. गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच या वेळी प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे (राज्य प्रवक्त्या), मा. महेशअण्णा साठे (सोलापूर लोकसभा प्रमुख), मा. अमोलबापू शिंदे, मा. अमरदादा पाटील, मा. मनीष काळजे, मा. प्रथमेशदादा म्हेत्रे (नगराध्यक्ष, दुधनी), मा. रविनाताई राठोड (महिला जिल्हाप्रमुख), मा. बाबासाहेब पाटील (ता. प्रमुख), मा. योगिनाथ पाटील (ता. प्रमुख) यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हा शुभारंभ बुधवार, दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता, बोरामणी (ता.दक्षिण सोलापूर) येथे होणार आहे.
या जनसंपर्क कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाणार असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार आहे.
या कार्यक्रमास शिवसैनिक, नागरिक, मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी केले आहे.

0 Comments