Advertisement

Breaking News
Loading...

“निवडणुका जिंका, पण खून नको!” — सोलापुरात अमित ठाकरेंचा संतप्त इशारा...

 


सोलापूर शहर| हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरातील जोशी गल्ली, रविवार पेठ येथील स्व. बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून दुःखात सहभागी होत धीर दिला.


यानंतर पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. “राजकारणात ७० ठिकाणी निवडणुका जिंका, पण खून नको. महाराष्ट्रात वाढत चाललेली गुन्हेगारी ही गंभीर बाब आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.


सोलापुरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर त्यांनी चिंता व्यक्त करत, सामान्य नागरिकांचे संरक्षण हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे नमूद केले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, दोषींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments