Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथे थरारक अंतिम लढत: एकचाक डावावर पैलवान सिकंदर शेखचा दणदणीत विजय...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिकंदर शेख याने हरियाणाच्या बलाढ्य मल्ल विशाल भोंदू याचा एकचाक डावावर पराभव करत मळसिद्ध केसरीचा मान पटकावला. दोन्ही मल्लांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सिकंदर शेख यांनी अनुभव, ताकद आणि अचूक डावपेचाच्या जोरावर निर्णायक विजय मिळवला.


अंतिम कुस्तीत सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी एकमेकांवर आक्रमक चढाया करत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. निर्णायक क्षणी सिकंदर शेख यांनी एकचाक डाव लावत विशाल भोंड याला चितपट केले आणि महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.


विजयानंतर सिकंदर शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांना रोख 4 लाख रुपये, चांदीची गदा तसेच मानाची कडा देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या वेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, कुस्ती पंच समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते.



या विजयामुळे सिकंदर शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या परंपरेत त्यांचा हा विजय संस्मरणीय ठरला आहे.



Post a Comment

0 Comments