Advertisement

Breaking News
Loading...

पनवेलच्या भाविकांवर काळाची झडप; मोहोळनजीक भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू, एक महिला जखमी...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी |

सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटी येथे शनिवारी रात्री सुमारे ११:४५ वाजता झालेल्या भीषण कार अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.


पनवेल येथील मित्रांचा एक गट अर्टिगा कार (क्र. MH-46 Z 4536) ने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाला होता. देवडी पाटीजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुसाट वेगातील कार रस्त्यापासून सुमारे १० ते १५ फूट दूर असलेल्या झुडपांतील झाडावर जोरात आदळली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की कार पूर्णतः चक्काचूर झाली असून मृतदेह वाहनात अडकून पडले होते.


घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेडगे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. या अपघातात ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



मृतांची नावे पुढीलप्रमाणे :

माला रवी साळवे (वय 40) – पंचशील नगर झोपडपट्टी, सेक्टर 18, न्यू पनवेल

अर्चना तुकाराम भंडारे (वय 47) – सेक्टर 7, खांदा कॉलनी, पनवेल वेस्ट

विशाल नरेंद्र भोसले (वय 41) – आरबीआय एमएसओ, रूम नं. 8, रेल्वे कॉलनी, पनवेल स्टेशनजवळ

अमर पाटील – खारघर

आनंद माळी

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पोलीस निरीक्षक शेडगे अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments