मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
आधार प्रतिष्ठान सोलापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने बंकलगी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण राधानगरीचे माजी सहायक गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेस प्रोजेक्टर , साऊंड सिस्टीम , बॅंड संच व पाण्याची टाकी इ. साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी बीट विस्तार अधिकारी सैपन आळगी, केंद्रप्रमुख नागनाथ स्वामी, सरपंच चंद्राम सगरे, मुख्याध्यापक काशिनाथ कोणदे, राजशेखर सगरे, सोसायटी चेअरमन बसवराज गुरव , व्हा . चेअरमन के.डी.शिंदे , डॉ. रणजित देशमुख, जगन्नाथ रुपनुरे, लक्ष्मण मदभावी, आप्पाराव काळे, जगदिश देशमुख, रंगराव जगताप, सुभाष मदभावी, मल्लिकार्जुन धुळखेडे, पिंटू बनसोडे, सत्यप्पा पिरगोंडे, मल्लिकार्जुन कुरे, राहूल शेतसंदी, जेवप्पा जेऊरे, पिंटू माने, केशव बनसोडे, नागनाथ गायकवाड, नागदेव मोटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन फुलारी, उपाध्यक्षा भाग्यश्री कुंभार, प्रतिष्ठानचे संचालक आप्पासाहेब कोळी व दिनेश कुलकर्णी इ. उपस्थित होते.
मनोगतामध्ये स्वामी, अळगी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मल्हारी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना आधार प्रतिष्ठान च्या वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर नळे यांनी केले तर आभार सुलोचना निकते मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सौ. कुरणावळ, सौ. देशमुख यांनी अथक प्रयत्न केले.



0 Comments