Advertisement

Breaking News
Loading...

शरीलाला श्रमाची आणि मनाला संस्काराची गरज : डॉ. राजेंद्र वडजे...

 


मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप बसवनगर येथे पार पडला. प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील रासेयोचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र वडजे हे होते तर अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे सचिव एम डी कमळे होते तर प्रमुख उपस्थिती भारतीय सुराज्य संस्थेचे संचालक बलभीम वारे यांची होती.



प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.समारोपप्रसंगी बोलताना डॉ राजेंद्र वडजे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिबिरात केलेले श्रम आणि मिळवलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल. कारण अलिकडच्या काळात शरीराला श्रमाची व मनाला संस्काराची गरज आहे. सोशल मीडियाच्या नादाला लागून तरुण वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे संस्कारहिन पिढी निर्माण होत आहे. यासाठी विचारवंत व महापुरुष यांचे कार्य वाचले पाहिजे. यावेळी त्यांनी पोपटराव पवार, सिंधूताई सपकाळ, मेधा पाटकर, राणी बंग, अभय बंग यांच्या कार्याची आठवण करून देत अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिली. कु. श्वेता सलगरे व नागेंद्र बिराजदार यांनी शिबिरातील अनुभव कथन केले. अध्यक्षीय भाषणात एम डी कमळे म्हणाले की, १९६९ पासून सुरू झालेली ही राष्ट्रीय सेवा योजना आजच्या तरुणांना स्फूर्ती देणारी आहे. सेवावृत्ती भाव मनात निर्माण होतो. म्हणून शिबिरार्थींनी घरी गेल्यावर हिच सेवावृत्ती समाजाच्या हितासाठी जोपासावी, असे ते म्हणाले.



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जवाहर मोरे यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एच. एल. जाधव यांनी मानले.


यावेळी रासेयो समिती सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments