Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रुप येथील संतोष पाटील महाविद्यालयात रांगोळी व पोष्टर स्पर्धा संपन्न...

 


मंद्रुप | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: - येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात गणित विभागाच्यावतीने गणितीय रांगोळी व पोष्टर स्पर्धा उत्साहात घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रारंभी गणित विभागाचे प्रा.व्हि.एस. आटकर यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले व आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे गणितीय महत्व विषद केले. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी गणितासारखा अवघड विषय सोप्या पध्दतीने मांडण्यासाठी रांगोळी व पोष्टर स्पर्धेचा उत्तम उपक्रम घेतला आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद पाहून या उपक्रमाचे कौतुक केले.



या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून डॉ. संतोष कदम, डॉ. के. यू.गरड , डॉ.बी.एस. कोरे व डॉ.जे. डी. नादरगी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ लतिका कट्टिमनी यांनी केले तर आभार प्रा. विजय साळवे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments