मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी आरिफ नदाफ :
मंद्रुप जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सनाकौसर महमद शेख, मंद्रुप पंचायत समिती गणातून अनंत जगन्नाथ म्हेत्रे तर कंदलगाव गणातून शांताबाई व्हनमाने हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव महमद शेख यांनी केले आहे.
यावेळी बोलताना महमद शेख म्हणाले की, “ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे. द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध प्रेम, एकता, बंधुता, नम्रता आणि लोकशाही मजबूत करण्यासाठीची ही लढाई आहे. काँग्रेस पक्ष सामान्य जनतेच्या हक्कासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे.”
सनाकौसर महमद शेख, अनंत म्हेत्रे आणि शांताबाई व्हनमाने हे सर्व सामान्य कुटुंबातून आलेले असून जनतेशी असलेली नाळ, काँग्रेस पक्षाबरोबरची तळमळ आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही गरीब असलो तरी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मजबूत आहोत. जनतेचा विश्वास आणि हक्कांसाठी सदैव तत्पर राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंद्रुप जिल्हा परिषद गट क्रमांक ६१ अंतर्गत मंद्रुप, बसवनगर, वडकबाळ, वांगी तसेच कंदलगाव, येळेगाव, गुंजेगाव, गावडेवाडी, मनगोळी, अंत्रोळी, अकोले मंद्रुप, विंचूर व शंकरनगर या गावांतील मतदारांना काँग्रेसच्या हाताच्या पंजा या चिन्हासमोर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“आपलं मत काँग्रेसला, आपलं मत विकासाला, आपलं मत विश्वासाला आणि ‘नफरत छोडो, भारत जोडो’ या विचारांसाठी काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला द्या,” असे आवाहन करत महमद शेख यांनी परिवर्तनासाठी सज्ज होण्याचा संदेश दिला.


.jpg)

0 Comments