मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ:
भीमा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाल्याने मंद्रूप गावाचा पाणीपुरवठा पुढील आठ ते दहा दिवस पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मंद्रूपचे ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
भीमा नदीवर आधारित असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर याचा थेट परिणाम झाला असून सध्या नदीपात्रात अपुरा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गावाला होणारा नियमित पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पर्यायी पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही ग्रामसेवकांनी सांगितले.
पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :
प्रा डॉ राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
हॅलो रिपोर्टर न्यूज
मोबाईल : 9923393329


0 Comments