Advertisement

Breaking News
Loading...

प्रा. युवराज भोसले यांची राज्यस्तरावर झेप प्रा. युवराज भोसले यांची राष्ट्रीय शिक्षक मंचच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज |

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांच्या आक्रमक आंदोलन आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत आणि भाजपा माथाडी कामगार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सुनील घोडेकर यांच्या सूचनेनुसार  'राष्ट्रीय शिक्षक मंच भारत' या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी' निवड झालेली आहे.

या निवडीचे पत्र राष्ट्रीय शिक्षक मंच भारत या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिरुद्ध मिश्र यांनी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले आहे. सदर ही संघटना राष्ट्रीय स्वयंम सेवा संघ प्रणित असून संपूर्ण भारतात ती व्यापलेली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रा. भोसले यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा हा मान मिळाला आहे.

या निवडीनंतर प्रा. युवराज भोसले यांचे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, राज्य संघटक प्रा. अशोक पाचकुडवे, जिल्हा सचिव रवी देवकर, महिला प्रतिनिधी निर्मला मौळे, सरपंच शाहीर सलगर लोकनेते दूध संकलनचे चेअरमन अनिल शिंगाडे, प्राचार्य श्रीधर उन्हाळे, प्राचार्य शत्रुघ्न बाबर,राजाभाऊ शिंगाडे प्राचार्य बाळासाहेब गुंड, मुख्याध्यापक दयानंद चौधरी, सूर्यकांत असबे बॉस, शिवाजी जगताप सर, उपप्राचार्य प्रकाश शिंदे सर, उपसरपंच मुकुंद शेळके आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments