Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील अंतिम उमेदवाराची यादी जाहीर... एकूण ८० उमेदवार रिंगणात...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

दक्षिण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ गटांसाठी २८ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एकूण ८० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

दक्षिण सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६ गटांसाठी सुरुवातीला एकूण ७३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात ४५ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता केवळ २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी एकूण १४५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ९३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, सध्या ५२ उमेदवार मैदानात आहेत.

मोठ्या प्रमाणावर अर्ज माघारी झाल्याने अनेक ठिकाणी थेट तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे. अर्ज माघारीनंतर आता प्रचाराला वेग आला असून, तालुक्यात राजकीय हालचालींना चांगलाच रंग चढू लागला आहे.


सोलापूर जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक 2026

अंतिम उमेदवारांची यादी (नाव व चिन्ह)

निवडणूक विभाग : 57 – बोरामणी (सर्वसाधारण)

अ.क्र., उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह पुढीलप्रमाणे:


1) आचलारे धनेश सुभाष - धनुष्यबाण

2) नेताजीभाऊ गंगाधर खंडागळे - कमळ

3) संजय बाबू राठोड - हात

4) तय्यब बशीर शेख - गॅस सिलेंडर

5) रणजित दिगंबर माने- पुस्तक

6) अनिता योगेश माळगे - ऑटो रिक्षा


निवडणूक विभाग : 58 – कुंभारी (ना.मा.प्र. महिला)

अ.क्र., उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह पुढीलप्रमाणे:

1) रेणुका सिद्धराम इमडे - धनुष्यबाण

2) प्रियंका चंद्रकांत गुंडे - हात

3) प्रियंका तुळजाराम दोंतूल - हातोडा, विळा आणि तारा

4) श्रुती गणेश भोरगुंडे - कमळ


निवडणूक विभाग : 59 – वळसंग (ना.मा.प्र.)

अंतिम उमेदवारांची यादी (नाव व चिन्ह)

अ.क्र., उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह पुढीलप्रमाणे:

1) युनूस करिमसाब कांबळे - हात

2) आरिफ बाबूमिया कुरेशी - धनुष्यबाण

3) रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी - कमळ

4) प्रसाद बसवराज बाबानगरे - झाड

5) सलिम शमशोदिन तांबोळी - एअर कंडिशनर


निवडणूक विभाग : 60 – हत्तूर (सर्वसाधारण महिला)

अंतिम उमेदवारांची यादी (नाव व चिन्ह)

अ.क्र., उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह पुढीलप्रमाणे:


1) चंद्रकला राधाकृष्ण पाटील - हात

2) लक्ष्मीबाई रतिकांत पाटील - धनुष्यबाण

3) सौ. श्रीदेवी शरणप्पा बमणगे - मशाल

4) उज्ज्वला अनिल हरिनाळे - कमळ


निवडणूक विभाग : 61 – मंद्रुप (सर्वसाधारण महिला)

अ.क्र., उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह पुढीलप्रमाणे:


1) सोनाली परसप्पा कडते - कमळ

2) प्रीती प्रभाकर कोरे - घड्याळ

3) प्रियंका संतोष बरूरे - धनुष्यबाण

4) शेख सनाकौसर महमद - हात


निवडणूक विभाग 62 – भंडारकवठे (अनुसूचित जमाती – महिला)

1) सौ. सविता महेंद्र उबरजे – कमळ

2) रूपदेवी अमसिद्ध कमळे – हात

3) कांचन राजू खडबडे – घड्याळ

4) सौ. जयश्री आप्पा संगोळगी – धनुष्यबाण

5) चव्हाण लक्ष्मी गंगाधर – बॅट


निवडणूक गण 113 – कासेगाव (सर्वसाधारण)

1) श्री उमेश रामा काळे – घड्याळ

2) आप्पा रामचंद्र धनके – हात

3) विजय उमाकांत राठोड – कमळ

4) विनोद सिद्राम बनसोडे – गॅस सिलेंडर

5) परमेश्वर प्रल्हाद रणसुरे – बस

6) संदीप रुपचंद राठोड – कपाट


निवडणूक गण 114 – बोरामणी (ना.मा.प्र. महिला)

1) चव्हाण सुनीता रमेश – धनुष्यबाण

2) वर्षा सोमनाथ पटणे – कमळ

3) प्रिती शैलेश पाटील – हात

4) सौ. काजल संदीप राठोड – मशाल


निवडणूक गण 115 – कुंभारी (सर्वसाधारण)

1) मल्लिकार्जुन जनप्पा खसगे – मशाल

2) सूरज संजय पाटील – कमळ

3) रोहित दीपक बिराजदार – धनुष्यबाण

4) शब्बीर जवरोद्दीन मनियार – घड्याळ

5) नितीन अंबादास यादगिरी – हातोडा, विळा आणि तारा


निवडणूक गण 116 – धोत्री (ना.मा.प्र. महिला)

1) अश्विनी श्यामसुंदर आडम – हातोडा, विळा आणि तारा

2) बिराजदार शिल्पा महेश – कमळ

3) अर्चना श्रीनाथ वाघमारे – धनुष्यबाण


निवडणूक गण 117 – वळसंग (अनुसूचित जाती)

1) संजय गुलचंद गायकवाड – हात

2) बलवान लक्ष्मण गोतसुर्वे – कमळ

3) दिनकर तुकाराम नारायणकर – धनुष्यबाण

4) खंडू कोडीबा वाघमारे – गॅस सिलेंडर


निवडणूक गण 118 – होटगी (सर्वसाधारण महिला)

1) चिवडशेट्टी शशिकला योगीराज – मशाल

2) अंबिका भिमाशंकर पाटील – कमळ

3) श्रेया विनोद पाटील – हात

4) सौ. शकुंतला सिद्धरामेश्वर बिराजदार – ट्रॅक्टर

5) सुरेय्या जाकीरहुसैन पिरजादे – कपाट

6) रुपाली महादेव बिराजदार – ऑटो रिक्षा

7) जयाप्रदा लक्ष्मण राऊत – सफरचंद


निवडणूक गण 119 – हत्तूर (सर्वसाधारण)

1) अनिल प्रभुलिंग गवळी – मशाल

2) श्री दिगंबर नरसप्पा विश्वनाथ – धनुष्यबाण

3) पंचप्पा निंबू धनशेठी – कमळ

4) रावसो सोमनिंग व्हनमाने – हात

5) खाजामिन बनेसो काझी – नारळ


निवडणूक गण 120 – औराद (सर्वसाधारण)

1) संदीप अमृत टेळे – कमळ

2) श्रीमंत म्हाळप्पा डोमानाळे – घड्याळ

3) सतीश अशोक देवकते – हात

4) परमेश्वर शिवराम शिंदे – धनुष्यबाण

5) जगदेव मारुती गायकवाड – गॅस सिलेंडर


निवडणूक गण 121 – मंद्रूप (ना.मा.प्र.)

1) अप्पाराव गोपाळराव कोरे – घड्याळ

2) कासिम महेबूब मकानदार – हातोडा, विळा आणि तारा

3) मळसिद्ध शिवानंद मुगळे – कमळ

4) अनंत जगन्नाथ म्हेत्रे – हात

5) जावेद बाबुलाल लिगेवान – फुटबॉल


निवडणूक गण 122 – कंदलगांव (सर्वसाधारण – महिला)

1) प्रियंका रमेश आसबे- कमळ

2) शांताबाई दत्तात्रय व्हनमाने- हात

3) महादेवी शंकर स्वन्ने - धनुष्यबाण


निवडणूक गण 123 – भंडारकवठे (अनुसूचित जमाती – महिला)

1) नेहा शशिकांत कुपसंगे- कमळ

2) प्रियंका चंद्रशेखर कुबसंगे- धनुष्यबाण


निवडणूक गण 124 – निंबर्गी (अनुसूचित जाती – महिला)

1) श्रुती चंद्रशेखर गायगवळी - हात

2) अंबिका शशिकांत दुपारगुडे - कमळ

3) काजल नारायण साबळे - धनुष्यबाण


Post a Comment

0 Comments